उस्मानाबाद (प्रतिनिधी )

डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल,गडपाटी,आळणी, उस्मानाबाद  येथील आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये ओरिएंटेशन कम फ्रेशर्स डे.उत्साहात साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील,  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य  सुनील अंधारे व मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा.माने यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी फार्मसी क्षेत्रातील वेगवेगळ्या रोजगार संधी यावरती प्रकाश टाकला.

 या वेळी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी औषधनिर्माण शास्त्र बरोबरच आपल्या कला, क्रीडा गुणांना वाव द्यावा, तसेच त्यांनी त्यांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता सतत प्रयत्न करत रहावे असे आवाहन करण्यात आले व संस्था कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही दिली.  यावेळी  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अंधारे व विभाग प्रमुख माने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. छत्रपती राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील यांनी आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय उस्मानाबाद शहराची मागास ही ओळख पुसून टाकेल अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालयातील प्रा.श्रीमती सुप्रिया लोंढे यांनी फार्मसी अभ्यासक्रम, महाविद्यालयातील शिस्त, तसेच फार्मसी क्षेत्रातील करिअर अपॉर्च्युनिटी विषयी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लोमटे तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश मते यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top