तेर / प्रतिनिधी-

 लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वतीने तेर येथे मकर संक्राती निमित्त हळदी कुंकू, तिळ गुळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.                                 या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बक्षिस म्हणून  पैठणी ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेतल्या लहान मुलींपासून ते अबाल वृद्ध महिलांनी देखील यात सहभाग नोंदवला. सर्वांचे खास आकर्षण ठरले ते उखाणे स्पर्धा. विविध आकर्षक उखाणे घेऊन महिलांनी उपस्थित महिलांचे मनोरंजन केले. यात.अनुसया  नाईकवाडी यांनी बाजी मारून पैठणी जिंकली. तसेच संगीत खुर्ची स्पर्धेत देखील अनेक महिलांनी सहभाग घेतला, अत्यंत चुरशीने झालेल्या स्पर्धेत शेवटी.शोभा गडकर या विजेत्या ठरल्या, त्यांना पैठणी बक्षीस मिळाली. लिंबू चमचा स्पर्धेत.पुष्पा झिंजे यांनी बाजी मारत पैठणी जिंकली. जगातील चालू घडामोडीचे महिलांना ज्ञान असावे म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. विचारलेल्या अनेक प्रश्नांना महिलांनी बरोबर उत्तरे दिली. यात . सुचिता  साळुंके यांचा पहिला क्रमांक आल्याने त्यांना पैठणी बक्षीस मिळाली. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या नावे असलेल्या लकी ड्रॉ मध्ये रिजवाना तांबोळी या नशीबवान ठरल्या, लहान मुलीच्या हस्ते काढण्यात आलेल्या चिट्ठीत तांबोळी यांचे नाव निघाले. त्यांना बक्षीस म्हणून पैठणी देण्यात आली.भाजपा महिला जिल्हाध्यक्षा नंदा पुनगुडे,  मनीषा केंद्रे,  माधवी गरड,

 उषा येरकळ, तेरच्या सरपंच दीदी काळे,  विद्या माने, सुनीता गुंजाळ,  लतिका पेठे, जोशीला लोमटे यांच्यासह गावातील महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top