जळकोट / प्रतिनिधी -                     

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धा जळकोट बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 व 23 जानेवारी 2023 रोजी शालेय स्तरावर घेण्यात आल्या. त्यामध्ये खो-खो, कबड्डी, धावणे, गोळा फेक, लांब उडी आदी मैदानी स्पर्धेबरोबरच सामान्य ज्ञान व प्रश्नमंजुषा अशा बौद्धिक स्पर्धाही घेऊन विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास  साधण्याचे काम या स्पर्धांमधून करण्यात आले. सदर स्पर्धा ह्या इयत्ता पाचवी ते आठवी व नववी ते दहावी या दोन गटात घेण्यात आल्या. संबंधित स्पर्धेचा निकाल प्रजासत्ताकदिनारोजी घोषित करण्यात आला. सदर स्पर्धेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेत पाचवी ते आठवी गटातून इयत्ता सहावी मधील विद्यार्थी चि. राजहंस संजय रेणुके याने प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली. तर ऋषिकेश सुरवसे इयत्ता आठवी याने द्वितीय तर इयत्ता आठवी मधीलच कु. प्रतीक्षा मर्डे व कु. तनुजा चव्हाण यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. अगदी कमी वयात व इयत्ता सातवी व आठवी या वरिष्ठ वर्गांच्या तुलनेतील विद्यार्थ्यांपेक्षा इयत्ता सहावी मधील चि. राजहंस संजय रेणुके याने प्रथम क्रमांकावर बाजी मारल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माळगे व अन्य पदाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष सारणे, सहशिक्षक प्रदीप तरमोडे, वैभव पटवारी, महेंद्र शिंदे, गोपाळ बंदपट्टे, सहशिक्षिका सौ. पुष्पलता कांबळे, सौ. सारिका भोसले, सौ. श्रीदेवी घोडके, शिपाई सौ. प्रमिला स्वामी, माजी सैनिक संजय स्वामी व पालक, नागरिकांमधून विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.                      

 
Top