तुळजापूर  / प्रतिनिधी-

आई भवानी  विकृतीशी संघर्ष करण्यासाठी आम्हाला  बळ दे असे साकडे आपण श्रीतुळजाभवानी मातेला घातल्याचे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चिञाताई वाघ यांनी सोमवार दि.९ रोजी श्रीतुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर पञकारांशी संवाद साधताना केले. 

सोमवारी सकाळी भाजपा महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा चिञाताई वाघ यांनी श्रीतुळजाभवानी दर्शन घेतले देवीदर्शन नंतर पञकारांशी बोलताना पुढे म्हणाल्या कि माझे हे वर्षातील पहिले श्रीतुळजाभवानीचे  दर्शन आहे.  तिर्थक्षेञ तुळजापूर हे शक्ती स्थळ असुन  दर्शन घेताना उर्जा अनुभवास येते.  कुलस्वामिनीच्या  दर्शनाने सकारात्मक उर्जा मिळते .विकृतीशी लढण्यास बळ दे  शक्ती दे, स्वैराचारांना पाठींबा देणाऱ्यांना   पाठींबा न देण्याची  बुध्दी दे असे साकडे आपण देविला घातल्याचे यावेळी सांगितले.

 याच  महाराष्ट्रातील महिला विकृती चे समर्थन करतात याची  खंत वाटते  यावेळी म्हणाल्या , रुपाली चाकणकर यांच्या तुमचा अभ्यास कमी आहे या आरोपाला उत्तर देताना वाघ म्हणाल्या तुमचा अभ्यास किती आहे हे तुमच्या  नेत्यांना  ना सांगा  जिथे विकृती उठते तिच्या विरोधात लढणारच  असे यावेळी म्हणाल्या   सामाजिक व राजकिय विकृती कोन पसरवतय हे सर्वाना माहीत आहे, असे  महाराष्ट्रातील आई ताई  बाबा दादा यांना हे पसंत नसल्याचा उल्लेख यावेळी केला.त्यामुळे काहीही करा पण अशा विकृती चे समर्थन करु नका, असे आवाहन यावेळी केली.

पंकजाताई मुंढे राजकारण व समाजकारणाकडे गंभीर पणे पाहण्याची वेळ महाराष्ट्रात आली आहे यावर बोलताना वाघ म्हणाल्या कि त्या आमच्या नेत्या आहेत.त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याचे कारण नाही असे स्पष्ट करुन त्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले . 

यावेळी जि. प. उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील,  भाजपा महिला आघाडीच्या मिनाताई सोमाजी, अर्चना गंगणे, विजयाताई कंदले, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  संतोष बोबडे,  शहराध्यक्ष शांताराम पेंदे , आनंद कंदले सह भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top