उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रुपामाता परिवाराचे सर्वेसर्वा, ॲड.व्यंकटराव गुंड  यांचा 57 वा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.  जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, रुपामाता प्राथमिक विद्यामंदिर, रुपामाता मल्टिस्टेट व अर्बन क्रेडिट सोसायटी,  रुपामाता पॉवर लिमिटेड, माजलगाव,रुपामाता ॲग्रोटेक, पाडोळी या समूहातील विविध संस्थांनी गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील एक प्रसिद्ध वकील, एक प्रसिद्ध उद्योजक, कुशल प्रशासक असलेले एक मुरब्बी व्यक्तिम्त्व म्हणजे गुंड साहेब. स्वकेंद्रित विचार न करता समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते या भावनेतून अॅड. गुंड यांनी छोट्याशा उद्योगाचा शुभारंभ केला.... यशापयशाची काळजी न करता विकासाचे स्वप्न त्यांनी पाहिले..... अल्पावधीमध्ये नावारूपास आलेल्या रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक असलेल्या ॲड. गुंड यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार सोहळ्यात साजरा करण्यात आला. अनेक क्षेत्रातील माननीय मंडळींनी कार्यक्रमास उपस्थित राहून श्री.गुंड साहेबांचे अभिष्ट चिंतन केले.

सालाबाद प्रमाणे उस्मानाबाद तसेच पाडोळी येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी, ॲड. श्री.शरद गुंड,  प्रसन्न देशमुख,  शुभम सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले, रेणुका ब्लड सेंटर व सह्याद्री ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य मिळाले.

ॲड.गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त बाल न्यायमंडळ सदस्या ॲड.वैशाली धावणे यांच्या उपस्थितीत मुलांचे बालनिरिक्षणगृह, उस्मानाबाद येथील मुलांना फळे, चित्रकलेचे समान इत्यादींचे वाटप करण्यात आले. यावेळी बाल निरीक्षण गृहाचे अधीक्षक, तसेच कर्मचारी उपस्थित होते.

रूपामाता अर्बन व मल्टीस्टेट व अर्बन क्रेडिट सोसायटीच्या समर्थनगर येथील मुख्य कार्यालयात ॲड.गुंड यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ‘रूपामाता दिनदर्शिकेचे’ अनावरण साहेबांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.विजयकुमार खडके, जनरल मॅनेजर,  सत्यांनारायण बोधले मुख्यकार्यकारी अधिकारी रुपामाता अर्बन,  मिलिंद खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रुपामाता मल्टीस्टेट तसेच कर्मचारी उपस्थित होते.

रुपामाता प्राथमिक शाळा, सांजा उस्मानाबाद येथेही गुंड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक  विजय पिंपरकर यांच्या संकल्पनेतून 'बालआनंद' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे केले होते, अशा अनोख्या पद्धतीने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी  पिंपरकर,सौ.श्रीखंडे, सौ.लोहार,सौ.शिंदे, सौ.पेठे आदी शिक्षक उपस्थित होते. रूपामाता उद्योग समूहाचे चेअरमन  व्यंकटरावजी गुंड साहेब यांच्या 57 वा वाढदिवस,रुपामाता नॅचरल शुगर यु.2 रोशनपुरी (ता. माजलगाव) येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला त्यावेळी कारखान्याचे संचालक  भाऊसाहेब गुंड, उद्धवकाका ताकट, शेषराव  खाडे, अण्णा केदारेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन  भगवानरा कदम , कारखान्याचे चीफ इंजिनियर प्रकाश गुंड, चीफ केमिस्ट कुलकर्णी, शेतकी अधिकारी  मुलानी   व सर्व कर्मचारीवृंद शेतकरी,ऊस उत्पादक,वाहतूक ठेकेदार यांचे उपस्थितीत वृक्षारोपण झाले. व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर शिक्षण संस्था उस्मानाबाद  द्वारा संचलित संत ज्ञानेश्वर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लासोना  येथे संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड. श्री. व्यंकटरावजी गुंड साहेब  यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा  देऊन विद्यार्थ्यांना खाऊ   व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व आपल्या लाडक्या साहेबांचे पुढचे भावी आयुष्य निरोगी रहावे म्हणून आई तुळजाभवानी मातेला वंदन करण्यात आले. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोसले सर, समुद्रवाणी गावचे प्रतिष्ठित नागरीक  शरद मनसुळे, अनिल अप्पा मंडगे, तुकाराम जाधव  शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खाऊ व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

 ॲड.गुंड यांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा सांजा रोड येथील समता इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणात पार पाडला.या कार्यक्रमाला तुळजापूरचे आ. राणा जगजितसिंह पाटील, भाजपा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  नितीन काळे, यांच्या हस्ते  विशेष सत्कार करण्यात आला. भाजयुमो अध्यक्ष  राजसिंहा राजेनिंबाळकर,धर्मादाय आयुक्त  पाईकराव   यांची विशेष उपस्थिती होती. शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, विधी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार मंडळी, उपस्थित होती.

 सूत्रसंचालन शेख यांनी केले, आभार प्रदर्शन रुपामाता समूहाचे एमडी ॲड. अजितकुमार गुंड यांनी केले.  श्री.सत्यांनारायण बोधले मुख्यकार्यकारी अधिकारी रुपामाता अर्बन, मिलिंद खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रुपामाता मल्टीस्टेट, सर्व शाखांचे व्यवस्थापक, रुपामाता उद्योग समुहाचे कर्मचारी, खातेदार, दूध संकलक, हितचिंतक मोठ्या संख्येने हजर होते. 

 
Top