उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात चालू केलेली लढाई रस्त्यावरली संपली असून आता  न्यालयीन लढाई सुरूच आहे, अशी माहिती भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. 

सोमवार दि.९ जानेवारी रोजी चित्राताई वाघ यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन दौऱ्यास प्रारंभ केला. उस्मानाबाद शहरात त्यांनी आर.पी. कॉलेज, महाजन कॉलेज, श्रीपतराव भोसले हाईस्कुल आदी कॉलेज व शाळांना भेटी देऊन मुलींचे मनोगत जाणून घेतले. त्यानंतर प्रतिष्ठाण भवन येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर महिला मेळावा ही घेतला. या पत्रकार परिषदेस जि.प.चे माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, भाजप महिला मोर्चाच्या जिलाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, भाजपा जिलाध्यक्ष नितीन काले, दत्ता कुलकर्णी, अॅड. अिनल काळे, अॅड.नितीन भोसले, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. 

उर्फी प्रकरणावर बोलताना चित्राताई यांनी ही विकृती असून आपल्या शहरातील चौकात असा नंगानाच केलेला चालेल का ? असा प्रश्न उपस्थित करून उर्फीचे प्रकरण बलात्कार झालेल्या एका नऊ वर्षाच्या मुलीच्या आईने यह प्रकरण समोर आणले, असे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी उगडे-नांगडे डांन्स होत असेल तर हे खपवून घेणार नाही, याबाबत गृह खात्याने ही दखल घेतली आहे, असे ही वाघ यांनी सांगितले. महिला आयोगाच्या नोटीसी विषयी माहिती देताना वाघ यांनी अध्यक्ष म्हणजे कांही आयोग नाही, त्यामध्ये मुंबई पोलिस महासंचालक हे सदस्य असतात, असेही सांगितले. समाजाच्या आरोग्याशी निगडीत हा विषय असल्याने आपण लावून धरला आहे, असे सांगून अजित पवार यांनी घेतलेले भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. 


 
Top