वाशी / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती वाशी अंतर्गत अनमोल महिला प्रभाग संघ तेरखेडा याची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि तालुकास्तरीय संक्रांत महोत्सवाचे आयोजन मौजे तेरखेडा येथे आज दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात  क्रांती ज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे श्री किरण कोळपे सह. सरकारी वकील अति जिल्हा व सत्र न्यायालय भूम .डॉ,जाधवर बीएचएमएस तेरखेडा ,श्री दिलीप घोलप सरपंच तेरखेडा, वैशाली गायकवाड तालुका अभियान  व्यवस्थापक ,अर्चना गडदे तालुका व्यवस्थापक ,अशोक बांगर प्रभाग समन्वयक, मोहिनी राऊत स्किल कॉर्डिनेटर ,प्रियदर्शनी कांबळे प्रभाग संघ व्यवस्थापक तसेच शुभांगी थोरबोले अशा रसाळ भारती पांचाळ अनमोल महिला प्रभाग संघ पदाधिकारी तसेच प्रभागांतर्गत सर्व कॅडर आणि महिला उपस्थित होत्या

         या कार्यक्रमाच्या वेळी एड.किरण कोळपे यांनी महिलांना कायदा व सुव्यवस्था अंतर्गत महिलांवर होणारे अन्याय आणि त्याबाबतीत कोणकोणते कायदे आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डॉ.जाधवर यांनी महिलांना होणारे वेगवेगळे आजार आणि त्यावर कोणकोणते उपचार करावे तसेच महिलांनी मासिक पाळीच्या वेळी स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दिलीप घोलप सरपंच तेरखेडा यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या व्यवसाय विषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग संघ अध्यक्ष शुभांगी थोरबोले यांनी केले तसेच पुढील वर्षातील नियोजन प्रभाग संघ सचिव अशा रसाळ यांनी केले त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी कांबळे प्रभाग संघ व्यवस्थापक यांनी केले तर आभार प्रदर्शन सीआरपीला लता लावंड यांनी केले या कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रभागातील CRP शेवंता मोरे, लता लावंड ,सारिका जगताप ,सुलभा जगताप ,अश्विनी जगताप, स्वाती गपाठ,पल्लवी कागदे , जरीना शेख ,सारिका चौधरी ,स्वाती काळे ,दैवशाला थोरबोले, अनिता पंडित ,देवशाला विश्वेकर ,मनीषा मोरे ,साखरबाई डांगे, सुचिता जगताप, राजश्री गपाट यांनी केले.

 
Top