उस्मानाबाद /प्रतिनिधी -

धाराशिव भारतीय जनता युवा मोर्चा ने दर्पण दिन उत्साहात साजरा केला, तसेच मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने धाराशिव शहर व ग्रामीण भागातील प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया प्रतिनिधींचा सन्मान केला गेला, कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून केले ,आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करून  त्यांच्या हस्ते लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या सर्व पत्रकारांचा सन्मान केला गेला, जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्यातील सरकारने सुरू केलेली विकासकामे त्यामुळे बदलत असलेले धाराशिव जिल्ह्याचे चित्र यात जिल्ह्यातील पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, युवा मोर्चा प्रभारी अमोल निडवदे उपस्थित होते. यावेळी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देवून आ. पाटील पुढे म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या धाडसी निर्णयामुळे जिल्ह्याच्या रस्ते, रेल्वे मार्ग, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, वैद्यकिय महाविद्यालय, तेरणा सहकारी साखर कारखाना, तुळजाभवानी मंदिर परिसर आणि तुळजापूर तिर्थक्षेत्र विकास हे विषय मार्गी लागत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची ओळख बदलणार असून विकासाकडे वाटचाल सुरू आहे. याविषयी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे. 

या पुढील काळात ही जिल्ह्यात विकासाच्या प्रश्नांमवर काम करणार्याच लोकप्रतिनिधींसोबत पत्रकार कायम असावेत अशी अपेक्षा व्यक्त करून विकास कामात अडचण निर्माण करणार्याा प्रवृत्तींना बाजूला सारत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यास सर्वांनी असेच सहकार्य ठेवावे, असेही ते यावेळी म्हणाले. 

तर जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकारांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिल्याचे सांगून चांगल्या कामास जिल्ह्यातील पत्रकार नेहमी मदत करतात, असे गौरवउद्गार काढले. यावेळी बोलताना भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर म्हणाले की, पत्रकारिता हे संवादाचे माध्यम आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात हा संवादास प्रथम सुरूवात करून पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवली तसेच त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या युवा मोर्चा जिल्हा प्रभारी अमोल निडवदे यांनीही यावेळी युवा मोर्च्याच्या पुढील रुपरेषाची माहिती सांगितली  . यावेळी राजाभाऊ वैद्य (दैनिक भास्कर), धनंजय रणदिवे (दै.पुण्यनगरी), संतोष जाधव (TV9), देविदास पाठक (दुरर्शन/आकाशवाणी/दै.तरुण भारत), संतोष हंबीरे (दैनिक संघर्ष )उपेंद्र कटके (दिव्य मराठी), मच्छींद्र कदम (एकमत), कैलास चौधरी (साम टि.व्ही.), आकाश नरोटे (दै.जनमत), प्रशांक कावरे (दै.मराठवाडा नेता), प्रमोद राऊत (दै.सोलापूर तरुण भारत), कुंदन शिंदे (दै.जनमत), औदुंबर पडवळ (दै.दिव्यामराठी), श्रीराम क्षीरसागर (न्युज नेशन), बाबासाहेब अंधारे (दै. विकासधारा), राहुल कोरे (विकास धारा ),सुरज हनुमंत गोपने (सुक्षम न्युज), शेख जफर रब्बानी (युवा मशाल), सलीम पठाण (उस्मानाबाद न्युज), सुधीर पवार (दै.लोकपत्र), सय्यद इकबाल (दै लोकमत समाचार), अमजद सय्यद (उस्मानाबाद २४ तास), जी.बी.राजपूत (सुराज्य), रहिम शेख (महाराष्ट्र टाईम्स), मुस्तफा पठाण (ऑनलाईन), विकी ओव्हाळ (दै.त्रिशक्ती), सय्यद सलीम मुसा (दै.त्रिशक्ती), सतीश मातने (राजकीय कट्टा), पांडूरंग माने (तेरणेचा छावा), संतोष खुने (सम्राट भुषण/दै.सम्राट), प्रशांत गुंडाळे (दै.पुढारी ग्रामीण), सय्यद शाहरुख (दै.पुण्यनगरी), अजित माळी (दै.समय सारथी), अय्युब शेख (NTV मराठी), सुभाष कदम पाटील (एकमत),के बी साळुंके  या सर्व मान्यवरांचा सन्मान केला गेला ,यावेळी संदीप कोकाटे ,बप्पा उंबरे , संदिप इंगळे, प्र का स मकरंद पाटील , सचिन घोडके ,दाजीअप्पा पवार,हिम्मत भोसल, ओम नाईकवाडी, जगदिश जोशी, सचिन लोंढे, प्रसाद मुंडे, स्वप्नील नाईकवाडी, राज निकम ,सुजित साळुंखे ,रोहित देशमुख ,सुनील पंगुडवाले ,सलमान शेख ,गणेश एडके ,धनराज नवले, नवनाथ सोलनकर, ओंकार देवकते, अप्पा नाईकवाडी ज्ञानेश्वर सुळ, सार्थक पाटील, सागर दंडनाईक ,माधव पाटील यांच्यासह भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.

 
Top