वाशी  / प्रतिनिधी-

वाशी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ह्यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. व सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शहाजी चेडे यांनी केले तसेच पत्रकार दिनाच्या अनुषंगाने प्रस्ताविक पर मार्गदर्शन केले.पत्रकारांनी विकासाच्या रथाचे सारथ्य करू नये, मात्र हा रथ मार्गावरून ढळणार नाही, यासाठी रथाच्या दोन्ही बाजूंना पहारा द्यावा व रथाला दिशा दाखविण्याचे काम करावे, असे आवाहन चेडे यांनी केलं.

या वेळी  व्हाईस ऑफ मेडिया च्या सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे  व सदस्य चे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाजी चेडे यांनी केले तर विलास गपात ,हारुण काझी यांनी मनोगत व्यक्त  केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुजावर एम आय यांनी केले यावेळी ,हरून काझी,शहाजी चेडे, , ज्ञानेश्वर जोशी,  सुधीर घोलप ,प्रशांत कुदळे ,शोएब काझी, विलास गपाट,अजय वीर ,  वैभव कुलकर्णी, नवनाथ टकले, वैभव पारवे, दादासाहेब लागाडे ,विश्वनाथ जगदाळे, दत्तात्रय  भराटे , शिवाजी गवारे ,राहुल शेळके आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

 
Top