उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जनतेच्या कामाचा पाठपुरावा मला सुध्दा अधिकार्‍यांकडे वारंवार करावा लागतो, अशी खंत व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी प्रशासनातील कांही अधिकारी जनतेचे काम करण्याबाबत अॅटो मोडवर नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. 

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दि. ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन पत्रकार भवनात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हण्ून जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे पोलिस अिधक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे व सरचिटणीस संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.    प्रशासन अॅटो मोडमध्ये नसते. प्रशासनास ॲक्टीव्ह मोडमध्ये आणावे लागते, असे ही जिलाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी सांगितले. यावेळी पोलिस अिधक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हयात सुरक्षीत वातावरण रहावे, यासाठी पोलिस खाते संतर्क असून महिला सुरक्षा व सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी करताना  जिल्हाधिकारी यांचे जिल्हयातील विकासात कशा पध्दतीने योगदान हे सविस्तरपणे सांगितले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार संतोष जाधव यांनी मानले. 

 या कार्यक्रमास  नंदकुमार पवार, राजाभाऊ वैद्य, संतोष हंबीरे,   सुभाष कदम  ,  सुरेशकुमार घाडगे  , प्रमोद कांबळे  , गौतम चेडे  , बालाजी वडजे ,   दीपक जाधव, प्रशांत कावरे, मल्लीकार्जुन सोनवणे, कैलास चौधरी, उपेंद्र कटके,संतोष शेटे, देविदास पाठक,  सुरेश कदम, भागवत शिंदे, पार्श्वनाथ बाळापुरे, शरद गायकवाड, श्रीनिवास भोसले, उमाजी गायकवाड,  सल्लाउद्दीन शेख, उत्तम बनजगोळे, सतीश मातने, किशोर माळी, राहुल कोरे, अजित माळी, लहू पडवळ, बाबुराव पुजारी, आयुब शेख, शहारूख सय्यद, श्रीकांत मटकेवाले,  रामेश्वर डोंगरे, पांडुरंग मते,शिला उंबरे, आकाश नरूटे, काकासाहेब कांबळे, संतोष बडवे, संतोष जोशी, प्रशांत कावरे, बालाजी साळुंके, चंदक्रांत भालेराव, राजेंद्र धावारे, संतोष खुणे आदीसह जिल्ह्यातील पत्रकार  उपस्थित होते. 

 
Top