कळंब./ प्रतिनिधी-

 शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे, न.प. प्रशासनाने तत्काळ मूलभूत प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख( ठाकरे गट) शिवाजी आप्पा कापसे यांनी दिला आहे.

 मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना दिलेली निवेदनात म्हटले आहे की, शहरातील प्रत्येक प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.घंटा गाडी वेळेवर येत नाही, त्या मुळे कचरा रस्त्यावर साचलेला असून, त्या मुळे  रोग राई होण्याची शक्यता आहे. धनेगाव धरणात मुबलक पाणी पुरवठा असतानाही, चार पाच दिवसाला पाणी सोडले जात आहे.तर काही भागात कमी दाबाचा पाणी पुरवठा होत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी च नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येवू लागली आहे.शहरातील अनेक भागात विद्युत दिवे बंद आहेत, घाणी बरोबर, अंधाराचे हि साम्राज्य असून, या मुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.शहरातील सर्व समाजाची धार्मिक स्थळे, मुख्य रस्ते,दररोज स्वच्छ करण्यात यावेत., या कडे प्रशासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांनी दिला आहे. या निवेदनावर, श्याम नाना खबाले, अतुल कवडे, रोहन पारेख, संजय होळे, सतीश टोणगे, अनिल पवार, गोविंद चौधरी, किरण राजपूत, सुरेश शिंदे, बापू जोगदंड , संतोष लांडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top