उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 निजाम कालीन देशमुख, महार, जोशी, देशपांडे अशा दिलेल्या‌ वतनी व इनामी जमिनी त्या काळीच म्हणजे ६० वर्षापूर्वी संबंधितांनी शासनाकडे नजराना रक्कम भरून वर्ग १ मध्ये वर्ग करून घेतलेल्या आहेत. मात्र उस्मानाबाद तहसीलचे तहसिलदार गणेश माळी व तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्यावतीने पीडित शेतकरी व प्लॉट धारकांनी दि.२७ जानेवारी रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

उस्मानाबाद येथील लेडीज क्लब येथून दुपारी २ वाजण्याच्या सुमारास निघालेला हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीन वाजण्याच्या सुमारास धडकला. या मोर्चात वृद्ध शेतकऱ्यांसह प्लॉटधारक व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.  या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष सुधीर पाटील, उमेश राजेनिंबाळकर, रेवणसिध्द लामतुरे, अनिल काळे, मसूद शेख, नजरोद्दीन हुसेनी, पद्माकर शेरखाने, आनंद जगदाळे, सतीश इंगळे, शिवाजी नाईकवाडी, संजय पवार, अभिजीत पवार, अभिजीत देशमुख आदीसह शेतकरी महिला- पुरुष मोठ्या संख्येने रखरखत्या उन्हात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन तास या मोर्चाकरांना संबोधित केल्यामुळे हा रस्ता दोन तासांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे दुतर्फा बंद करण्यात आला होता. 

 
Top