उस्मानाबाद / प्रतिनिधी 

उस्मानाबाद महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. कांही कर्मचाऱ्यांनी कांही भागातील वीज बंद करून संपात सहभाग नोंदवला. बंद झालेली वीज चालु करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी नेमलेले कंत्राटी कर्मचारी काम करताना दिसुन आले. 

महावितरणाचे खासगीकरण करू नये, महावितरण महापारेषण, महानिर्मतील अिधकारी व सर्व कर्मचाऱ्यांचा खासगी करणाला विरोध आहे. त्यामुळे दीड महिन्यापुर्वीच या संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर नागरपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा ही काढला होता. परंतू सरकार ने गांभिर्यामुळे न घेतल्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून संपास सुरुवात झाली. महावितरणाचे अभियंते, ऑपरेटर, कर्मचारी, लाईनमन आदी एक हजार कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. 


जिल्हयात २१५ कंत्राटी कर्मचारी असून संपात सहभागी होणाऱ्या कांही कर्मचाऱ्यांनी सबस्टेशन बंद करून संपात सहभाग नोंदवला. त्यामुळे अनेक भागातील वीज गायब झाली होती. याची माहिती कार्यकारी अभियंता, अिधक्षक अभियंता यांना िमळताच त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठवून वीजपुरवठा सुरळीत केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील ही कांही कर्मचारी संपावर गेल्याचे सांगण्यात आले. उस्मानाबाद शहराला ५० मेगावॅट वीजपुरवठा नियमीत लागतो,शहरातील सांजा रोड, एमआयडीसी, शहरातील कसबा भाग आदी भागातील वीज गेली होती. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सबस्टेशन चालु केले. 

 
Top