तुळजापूर/ प्रतिनिधी 

आदिशक्ती, जगतजननी, सर्वशक्तिशाली पूर्णपीठ श्री तुळजाभवानी देवीजींची बूधवार   (दि.४) शांकंभरी  नवरात्र महोत्सवातील विशेष महत्त्व असलेल्या सहाव्या  माळेदिनी हिंदुस्थानचे आराध्यदैवत विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांना 'भवानी तलवार' अर्पण करण्यात येत असलेली महापूजा देवीजींच्या सिंहासनावर मांडण्यात आली.

भवानी माता व छत्रपती शिवाजीराजेंच्या ऐतिहासिक प्रसंगाचा हा अद्वितीय क्षण डोळ्यात टिपण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापुरात देवीजींच्या सिंहासनावर देवी तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील प्रगटलेला ऐतिहासिक क्षण भवानी तलवार अलंकार महापूजेतून मांडण्यात येतो. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीकडून भवानी तलवार स्वीकारताना छत्रपती शिवाजी महाराज अशी पूजा सिंहासनावर

बांधण्यात आली होती. हिंदवी स्वराज्याचा विस्तार करीत असताना संकटसमयी भवानी मातेने प्रगट होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट देऊन अन्यायी व निर्ढावलेली राजेशाही नष्ट करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी आशीर्वाद छत्रपती शिवराय भवानी... दिल्याचे मानले जाते. याच निमित्ताने सदरील भवानी अलंकार महापूजा या ऐतिहासिक क्षणाच्या अनुषंगाने मांडण्यात येते. अतिप्राचिन देवस्थानात एखाद्या राजाला थेट सिंहासनावर मुर्तीरुपात अधिष्ठान मिळणे हा योग दुर्मिळच असून, यातूनच शिवाजी महाराज व भवानी माता यांच्यातील दृढ नाते स्पष्ट करते. 

 
Top