उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिंगोली आश्रम शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती सुनिता व्यवहारे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर  प्रमुख पाहुण्या श्रीमती सुरेखा कांबळे, श्रीमती श्रद्धा सूर्यवंशी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिंदे कुमंत, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक चित्तरंजन राठोड व्यासपीठावर उपस्थित होते.दरम्यान  अध्यक्षांची व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवन चरित्राची माहिती शानिमे मॅडम यांनी दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती आडे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमासाठी श्री खंडू पडवळ, शानिमे कैलास, पाटील रत्नाकर, आमदापुरे मदनकुमार, सतीश कुंभार, सुधीर कांबळे ,कोणदे सर, विशाल राठोड सर यांनी नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे आभार श्रीमती अनिता तोगरगे मॅडम यांनी केले.

 
Top