उमरगा/ प्रतिनिधी- 

 माजी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी गेल्या वीस वर्षाच्या कालावधि दरम्यान  शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शिक्षण संस्था व शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडविण्याची त्यांना जाण आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या करीता शासन स्तरावर त्यांचा लढा कायम आहे.कॉंग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना , शेकाप हे महाविकास आघाडीचे राजकिय पक्ष त्यांच्या सोबत आहेत. जुनी पेन्शन योजना हा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे प्रयत्नशील असल्यामुळे शिक्षकांनी आपले विविध प्रश्न मार्गी लावण्या साठी विक्रम काळे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहावे असे आवाहन महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस , राष्ट्रीय कॉंग्रेस , शिवसेना , शेकाप या महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे उमेद्वार विक्रम काळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित मतदार कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी बसवराज पाटील बोलत होते. प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव , तालुका कॉंग्रेस चे अध्यक्ष सुभाष राजोळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ. अंकुश कदम , प्राचार्य डॉ. दिलीप गरूड , अँड. व्ही.एस. आळंगे, मल्लीनाथ दंडगे , प्राचार्य डॉ. आशोक सपाटे सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना माजी राज्यमंत्री बसवराज पाटील म्हणाले कि - माजी शिक्षक आमदार कै. वसंतराव काळे यांनी मराठवाड्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नाला न्याय मिळवून दिला आहे. तोच समाज सेवेचा वारसा पुढे विक्रम काळे यांनी अखंडीत ठेवला आहे. लोकशाही मध्ये निवडणुकाना विशेष महत्व असल्याने शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याची जाण असलेल्या विक्रम काळे यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे. शाळा , महाविद्यालयाचे विविध प्रश्न रखडले आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला माणूस म्हणून विक्रम काळे यांना   खंबीर साथ द्या.असे आवाहन पाटील यांनी केले.

प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव यांचे भाषण झाले आहे. प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांनी प्रास्ताविक केले. प्रा.लक्ष्मण बिराजदार यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.डॉ. शौकत पटेल यांनी आभार मानले.

 
Top