उस्मानाबाद / प्रतिनिधी-

२०१९ ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला धर्म निरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे यासाठी आवाहन केले होते. परंतु  त्यावेळेस आघाडी करण्यास दोन्ही पक्षाने नाकारले होते. सध्या देशाची परिस्थिती पाहून आज परत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षानी एकत्र येऊन आघाडी करण्याची गरज आहे. मी जुना इतिहास विसरायला तयार आहे. माझा शरद पवार यांना विरोध नाही, पण राजकीय मैत्री ही प्रामाणिक असावी, असे माझे मत आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. 

औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणुकीनिमित्त प्रकाश आंबेडकर २७ जानेवारी रोजी उस्मानाबादेत आले होते. वंिचतच्या वतीने कालीदास माने हे उमेदवार असल्याचे सांगून राज्यात पाच पैकी चार ठिकाणी पदविधर व शिक्षक विधान परिषदेच्या जागा आम्ही लढवत आहोत. औरंगाबाद, जळगांव, नाशिक, नागपूर या चार ही ठिकाणी ग्रामीण व शहरी असे मतदारांचे विभाजन झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची परिस्थिती चांगली आहे. नवीन शिक्षण धोरण येणार असून या नवीन शिक्षण धोरणासाठी शिक्षकांना नव्याने तयार करण्याची गरज आहे. नाही तर १९७२-७३ साली आलेल्या शैक्षणीक धोरणामुळे पाच-सहा पिढ्या बरबाद झाल्या. त्यामुळे नवीन शिक्षण धोरण पुढील वर्षी येत आहे.यासाठी शिक्षक वर्ग तयार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री खोटे बोलतात. पेन्शनचा बोझा सरकारवर येत नाही, शिक्षकाच्या वेतनातून कपात झालेली रक्कम वेगळ्या हेडखाली येताे. तो पेन्शन फंड सरकार ने ७८ हजार कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले आहे. त्यात पुन्हा आदानी यांचे शेअर्स ३० टक्के पडले आहेत, असा आरोप ही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेस अशोक हिंगे, प्रा. राजा जगताप, प्रविण रणबागुल, संतोष सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. 


 
Top