उमरगा / प्रतिनिधी-

शहरातील वार्ड क्र.17 मधील कुंभार पट्टी येथे जवळपास 400 कुटुंबे इ.स.1965 पासुन म्हणजेच 55 वर्षापासून वास्तव्यास आहेत. सदर जमिनीचा मावेजा शासनाकडून जमीन मालकाला मिळूनही इतकी वर्ष उलटूनही अद्याप पर्यंत त्यांना कबाले मिळालेले नाहीत. यामुळे येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. सदर ठिकाणची सर्व कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील असुन ते मोलमजुरी करून उदर निर्वाह भागवतात. त्यांची मागील बऱ्याच वर्षापासून कबाले मिळणे बाबतची मागणी आहे. त्यासंदर्भात येथील नागरिकांनी दि.20/01/2023 रोजी  आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन अर्जाद्वारे विनंती केली आहे. त्या विनंती अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन किंवा वेळे प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन सदर विषय निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

 
Top