उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील  राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय युवराज नळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले युवराज नळे यांनी त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दलची माहिती सांगून मंत्रमुग्ध केले, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव हे लाभले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शांतीनाथ घोडके होते.

 सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना राष्ट्रीय क्षेत्र सेनेचे अधिकारी डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले ,तर आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी -विद्यार्थिनी एनसीसी कॅडेट उपस्थित होते.   सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top