उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या आठ दिवसापासून उस्मानाबाद शहरात पाणी पुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत आज काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मा.जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची भेट घेऊन उस्मानाबाद शहरातील पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्यासंदर्भात चर्चा केली व निवेदन सादर केले. 

मा.जिल्हाधिकारी यांनी तात्काळ नगर परिषद प्रशासन आणि MSEB विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला आहे.

त्यामुळे आज MSEB कडून उस्मानाबाद नगर परिषदेचा वीज पुरवठा चालू होईल व उद्या पासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी आशा आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, गटनेते सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, महिला प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, युवक माजी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, मानवाधिकार जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, युवक काँग्रेसचे स्वप्नील शिंगाडे, संजय गजधने, अभिजित देडे, इरफान कुरेशी, अजझर पठाण, सौरभ गायकवाड, जमिल सय्यद, सचिन धाकतोडे उपस्थित होते.

 
Top