उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दा नमूद असून याअंतर्गत राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फूटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फूटबॉल स्पर्धा आयोजित करुन, त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.

 त्याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्हास्तर “एफ सी बायर्न महाराष्ट्र कप” 14 वर्षाखालील मुले स्पर्धेचे आयोजन दि.09 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेचे ठिकाण नंतर कळविण्यात येईल.

 या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख दि.01 जानेवारी 2009 नंतरची असावी. तरी जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे. सहभागी होणाऱ्या संघाची प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दि.06 फेब्रुवारी 2023 पर्यंत दुपारी 3.00 वाजेपर्यंत सादर करावी तसेच माहितीसाठी क्रीडा अधिकारी नदिम शेख (9422651337) यांच्याशी संपर्क साधावा.

 
Top