उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा मंजुर प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला असुन तो लवकरच मंजूर करण्यात येईल तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात येईल, असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिली. लोकसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत श्री मिश्रा उस्मानाबादेत आले होते.माहिती त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुढे बोलताना श्री मिश्रा म्हणाले, नवीन मातृभाषेत शिक्षण मिळावे ही योजना लागु केल्यापासुन याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत आहे.स्थानिक व हिंदी भाषा यामुळे एकमेकांशी जोडला गेला. देशातील सीमा सुरक्षेबाबत केंद्र सरकार संवेदनशील असुन त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारताची सुरक्षा वाढली आहे. लोकसभा प्रवास या दौर्यानिमित्त जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबुतीकरण करणे, केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागा पर्यंत पोहंचत आहेत का हे पहाण्यात आले. उध्दव ठाकरे सरकारने गेल्या अडीच वर्षात केंद्राच्या योजना गावापर्यंत पोहंचवल्याच नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत जिल्ह्यात काम असल्याचे त्यांनी म्हटले. सोलार एनर्जीला प्राधान्य देण्यात येणार असुन कौडगांव एमआयडीसीत सोलार येणार असुन कौडगांव एमआयडीसीत सोलार प्रोजेक्टचे काम केले जात असल्याबद्दल त्यांनी आ.राणा पाटील यांचा विशेष उल्लेख केला. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा वापर केला. विधानसभा निकालानंतर युती असुनही शिवसेनेने दुसर्या पक्षाशी हातमिळवणीकरत सत्ता स्थापन केल्याचे त्यांनी म्हटले. आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामुळे महाराष्ट्राला विकासात पाच वर्षे मागे ढकल्याचे श्री मिश्रा म्हणाले. उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा मंजुर प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला असुन तो लवकरच मंजूर करण्यायत येईल, अशी माहिती त्यांनी दिली. वाघोली येथे भेट देवुन त्यांनी तेथील कामाची पहाणी केली तसेच कांही ग्रामस्थांचा सत्कार केला. यावेळी आ.राणा पाटील, भाजपचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, आ.बाळा बेगळे, अॅड.मिलींद पाटील उपस्थित होते.