तेर/ प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे निराधार ,विधवा महिलांना बजाज फायनान्स आणि बंधन बँकेच्या संयुक्त विद्यमाने तेर शाखेच्या वतीने  दोनशे महिलांना  रोजगार निर्मितीचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले.

   तेर येथील  बंधन च्या शाखेत  उपसरपंच श्रीमंत फंड,   ग्रामपंचायत सदस्य प्रतिक नाईकवाडी,   ,नवनाथ पसारे ,अजित कदम, संजय लोमटे, राम देशमुख, विजय कानडे ,किशोर काळे ,विकास भोरे, बंधन च्या तेर शाखा प्रमुख उत्तम रॉय फिल्ड, ऑफिसर विधान साह यांच्या हस्ते   तेरसह परिसरातील ढोकी ,तडोळा, गोरेवाडी,  ढोराळा, भंडारवाडी, उपळा, किनी, बुकनवाडी, हिंगळजवाडी, मुळेवाडी  गावातील महिलांना व्यवसाय साहित्य मोफत वाटप करण्यात आले.


 
Top