तेर/ प्रतिनिधी-

राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील एल.एस.एम.पी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील एल.एस.एम.पी सोसायटीच्या 13 जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती.सर्वसाधारण प्रवर्गातून 8 जागेसाठी 22 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले तर महीला प्रवर्गातून 2 जागेसाठी 8 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 1 जागेसाठी 3 नामनिर्देशन पत्र दाखल झाले तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून 1 जागेसाठी 3 नामनिर्देशन पत्र दाखल झाले तर भटक्या जमाती/विमुक्त जाती प्रवर्गातून 1 जागेसाठी 3 नामनिर्देशन पत्र दाखल झाले.परंतू इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व भटक्या जमाती/विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र बाद झाल्याने दोन्ही जागा निरंक आहेत.भाजप व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्यात तेर एल.एस.एम.पी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी चर्चा होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सहा तर महाविकास आघाडीचे पाच उमेदवार घेण्याचा निर्णय झाला.त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून सतिष कदम, तानाजी नाईकवाडी,मन्मथ चिवटे,मतिन मोमीन, महीला प्रवर्गातून कविता फंड तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून इश्वर साळुंके तर महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून सतिष सोमाणी,शहनवाज कबीर, धोंडीराम नाईकवाडी,रतन नाईकवाडी तर महीला प्रवर्गातून मंगल आंधळे बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.पी.काळे यांनी काम पाहिले.

 
Top