तेर / प्रतिनिधी-

शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील ई पीक पाहणी मोबाईल अॅप वर नोंदवावी असे आवाहन तेलाचे तलाठी पी.सी.देशमुख यांनी केले आहे.

शेतकरी बांधवांनी आपण आपल्या शेतातील पिकांची 7/12 उता-यावर नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी मोबाईल अॅप व्दारे करावी.ई पीक पाहणी न केल्यास हरभरा, ज्वारी,गहू इत्यादी पिकांची नोंद 7/12 येणार नसल्याने आपणास नाफेड मध्ये विक्री करता येणार नाही.तसेच नैसर्गिक आपत्तीचे गारपीचे अनुदान येणार नाही.आणि आपला 7/12 चा पीक पेरा चालू पड म्हणून आपोआप नोंद होईल.तरी आपण आपला पीक पेरा ई पीक पाहणी या मोबाईल अॅप वर नोंद करावा असे आवाहन तेरचे तलाठी पी.सी.देशमुख यांनी केले आहे.


 
Top