तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील तामलवाडी येथील कटारे स्पेनिंग मिल मधील कामगारांची  उपदानाची  रक्कम ग्रेच्युटी पेमेंट अॅक्ट 1972 या कायद्या अंतर्गत आजतागायत मिळालेली  नाही तरीती देण्यात यावी या कारवाई दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत त्यांना कंपनी चालविण्यास  मनाई करण्यात यावी  अन्यथा कामगार १ फेब्ब्रुवारी पासुन चक्री उपोषण करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन दिला आहे.

 निवेदनावर  कामगार संघटनेचे अध्यक्ष शाहीर गायकवाड, सचिव,मच्छीद्र माळी व राकाँचे विधानसभा अध्यक्ष माजी सैनिक शिवाजी सावंत यांच्या स्वाक्षरी आहेत. 


 
Top