तेर / प्रतिनिधी 

 उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथे  घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत तेर बीटच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यावेळी सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकवृंदाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींचा क्रीडा स्पर्धेत सहभाग वाढावा व मुला मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींसाठी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसारच रुईभर ता. उस्मानाबाद येथील जयप्रकाश विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दिनांक १२ जानेवारी रोजी १४ व १७ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेर बीट मधील तेर काजळा बुकनवाडी  वाणेवाडी पळसप जागजी आरणी गावातील जिल्हा परिषद शाळेतील खेळाडूंनी  तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत तेर बीटचे विस्तार अधिकारी एस यु काळे  , तेरचे केंद्रप्रमुख आर पी पडवळ , काजळ्याचे केंद्रप्रमुख आर बी मगर , गोरोबा पाडुळे ,  क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , श्रीमती सुरेखा कदम , सुनिता वाकुरे  प्रविण पडवळ , गणेश खडके , धनंजय थोडसरे , मौला शेख , क्रीडा शिक्षक उध्दव माने , नाईकवाडी सर , सुग्रीव घोगरे , रावसाहेब घुटे , यांच्या मार्गदर्शनाखाली तेर बीट मधील खेळाडूंनी धावणे , उंच उडी , लांब उडी , गोळा फेक , थाळी फेक , भाला फेक , हर्डल्स , बॅटन रिले , कुस्ती आदिंसह विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे कार्यालयीन विस्तार अधिकारी संजीव बागल यांनी तेर बीटमधील सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले.


 
Top