उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा शेतकरी बचाव राजकीय कृती समिती उस्मानाबाद आयोजित  पीडित शेतकऱ्यांचा व प्लॉट धारक यांचा आक्रोश मोर्चा यासंदर्भात आज श्रीपतराव भोसले हायस्कूल या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव प्लॉट धारक यांची बैठक झाली.

 या बैठकीमध्ये सर्वानुमते दिनांक 27/1/2023 वार शुक्रवार रोजी दुपारी 1. वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे लेडीज क्लब ते जिल्हाधिकार्यालय असा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा सरकारच्या विरोधात नसून प्रशासनाच्या विरोधात आहे ज्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक  वर्ग एकच्या जमिनीवर दोन मध्ये घातल्या आहेत त्यांच्या विरोधात आहे .यामध्ये तहसीलदार गणेश माळी, व तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर या दोन अधिकाऱ्यांनी वर्ग एकच्या जमिनी दोन मध्ये घातल्या आहेतण् देशाच्या नीतिमूल्य आयोगाच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून भारतामध्ये तीन नंबर जिल्हा म्हणून घोषित झालेला असताना व हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत तहसीलदार गणेश माळी व जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी 10% जमिनी वर्ग 1 वरून वर्ग 2 केल्या आहेत. या निर्णयामुळे मुळातच दुष्काळग्रस्त जिल्हा, आकांक्षीत जिल्हा व आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून घोषित जिल्हा असताना या निर्णयामुळे अजून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू शकतात याची नोंद शासनाने घेणे गरजेचे आहे.

यावेळी उस्मानाबाद जिल्हा शेतकरी बचाव राजकीय कृती समिती अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष सुधीर (आण्णा) पाटील, उमेश राजे निंबाळकर, सुभाष नाना पवार ,संजय पवार, अरुण महाजन, सुधाकर महाजन, दिलीप महाजन, बाबासाहेब केळकर, अर्जुन पवार, शिवाजी पवार, रणधीर देशमुख, जयसिंग पवार, एडवोकेट प्रसाद जोशी, औदुंबर पवार, अरविंद यादव, प्रभाकर घाडगे, उत्तरेश्वर दत्तुरे, राजपाल कदम, महादेव गंदुरे, आप्पासाहेब दळवे, दिनकर मिरज, प्रकाश जाधव, उद्धव धंधुरे, सत्यवान साळवी, सुनील मोघे, बालाजी दत्तुरे, अतुल डोलारे, श्रीहरी लोमटे, आसिफ कुरेशी,  अकीब कुरेशी, शेख इमाम मुनाफ, नेताजी पवार, आनंद भंडागळे, प्रताप कदम, दिलीप जोशी, सरदार सिंग ठाकूर इत्यादी शेतकरी प्लॉट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते


 
Top