उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मकर संक्राती सणा निमित्त शिंगोली ता.उस्मानाबाद येथे मा.जि. प.उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या वतीने  हळदी कुंकू कार्यक्रमचे आयोजित करण्यात आले होते. 

 शिंगोली येथील विठल रुक्मिणी मंदिर येथे संपन्न झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  होता. याप्रसंगी सौ. अर्चनाताई पाटील यांनी उपस्थित महिलांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

 यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.नंदाताई पूनगुडे, मनीषाताई केंद्रे, माधुरीताई गरड, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, सरपंच योगिताताई शिंदे, माजी सरपंच येडबा शितोळे, रंगनाथ शिंदे, संभाजी पडवळ ग्रामपंचायत सदस्य फुलनताई मगर, अलकाताई मगर, राणी कुंभार, सुनीता आडे, गावातील महिला उपस्थित होत्या.


 
Top