तेर/  प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन सात अश्वाच्या रथावर उभारलेली सूर्यनारायण यांची मुर्ती असल्याने रथसप्तमी निमित्ताने भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन उत्तरेश्वर मंदिरात सात अश्वाच्या रथावर उभारलेली सूर्यनारायण यांची मुर्ती असून सूर्यनारायण यांच्या संज्ञा व छाया या दोन पत्नी असून सूर्यनारायण यांच्या पाठीमागे उत्कृष्ट कोरलेली प्रभावळ आहे.मुर्ती पुरातन असून मुर्तीवर उत्कृष्ट कोरलेली सुरेख कलाकुसर केलेली आहे.राज्यात अशा प्रकारची पुरातन सूर्यनारायण मुर्ती तेर येथे एकमेव असल्याने राज्यातील भाविक भक्त रथसप्तमी दिवशी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.


 
Top