तुळजापूर /  प्रतिनिधी 

माघी वारीनिमित्त निघालेल्या मल्लीनाथ महाराज संस्थान,औसा येथील माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे  श्री.क्षेत्र तुळजापुरमध्ये गुरुवार दि२६रोजी आगमन  तुळजापुर(खुर्द) येथील न.प.शाळा क्रं.3 येथे होताच  यावेळी तुळजापूर न.प .च्या वतीने कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, कर्मचारी प्रमोद भोजने यांनी दिंडीचे स्वागत केले व श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे शाल फेटा, पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी नाथ सेवा मंडळाचे श्रीकांत घोडके,गणेश नन्नवरे,प्रमोद भोजणे, दुर्वास भोजने,हनमंत साबळे, हणमंत माळी,शरद जगदाळे, दिपक माळी, शंकर भोजने,मुख्याध्यापक मोटे सर व भक्तगण उपस्थित होते.


 
Top