उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 देशातील कठीण प्रदेशात अहोरात्र डोळ्यात तेल घालून भारतीय सिमांचे संरक्षण करणारा भारतीय जवान सातत्याने भारतातील तरुणाईसाठी प्रेरणास्त्रोत ठरत असून मौजे. दाबका ता. उमरगा येथील माजी सैनिक श्री. अनंत बलभिम माने यांनी दि. 29 जुन 2004 रोजी ऑपरेशन दिवार LOC मध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत स्वत: जखमी असताना त्यांच्या इतर दोन जखमी सहकाऱ्यांना 1.5 कि.मी. घेवून आले त्यांनी दाखविलेल्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना आज पोलीस परेड ग्राऊंड, शिवाजी नगर, पुणे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ताम्रपत्र देवून गौरविण्यात आले.   त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याचा आम्हास अभिमान आहे.


 
Top