तेर/  प्रतिनिधी 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पत्रकार नरहरी बडवे अकरा वर्षापासून कै.डाॅ. चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृती दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करीत असतात. यावर्षी त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर मीटर धावणे स्पर्धा आयोजित केली होती. या वर्षीपासून नरहरी बडवे यांनी कै. डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृती पुरस्कार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलेला कै. डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षीचा कै. डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील स्मृति पुरस्कार तेरच्या रहिवासी व सध्या सांगली येथे कार्यरत असलेल्या साहित्यिका प्रतिभा पद्माकर जगदाळे यांना जाहीर करण्यात येत आहे.अशी माहिती जि. प. माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दिली. 

सौ प्रतिभा पद्माकर जगदाळे यांची भावनांच्या हिंदोळ्यावर, अनुबंध, मिश्किली,  चंदनवृक्ष,  भावतरंग,  मुक्ता पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सौ प्रतिभा पद्माकर जगदाळे यांना स्मृतिचिन्ह, शाल, फेटा,हार, पुष्पगुच्छ, अकराशे रुपये देऊन फेब्रुवारी 2023 मध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करून कै. डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दिली आहे.


 
Top