उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अविकसित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात एक वेगळी छाप टाकलेली आहे. जिल्ह्यास अनेक पदके, पुरस्कार प्राप्त करून देणारे खेळाडूंची स्पर्धेतील कामगिरी महत्वपूर्ण असून आंतराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याची ओळख करून देणारे खेळाडूच जिल्ह्याची खरी संपत्ती असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर विभागस्तर शालेय ऍथलेटिक्स  स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रजीत जाधव यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त राजकुमार सोमवंशी ,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे ,जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले,क्रीडा अधिकारी कैलास लटके,शिवकुमार कोळी,महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर आदींची प्रमुख उपस्तीथी होती.

स्पर्धेत जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे सहसचिव राजेंद्र सोलनकर, सदस्य राजेश बिलकुले, संजय कोथळीकर, सचिन पाटील,अजिंक्य वराळे,माउली भुतेकर,,मुनीर शेख, अश्विन पवार, कुलदीप सावंत , ऋषिकेश काळे, अजिंक्य वराळे, अनिल भोसले, रोहित सुरवसे,गणेश मुळे,तारे सर ,घोडके मॅडम,कांता राऊतगोळ मॅडम ,अविनाश थोरबोले, सुरज ढेरे, आवारे आदींनी पंच म्हणून काम पहिले.


 
Top