नळदुर्ग / प्रतिनिधी-

 ज्यांच्या शौर्यामुळे खऱ्या अर्थाने नळदुर्गची भुमी पावन झाली, आणि ज्यांना देशाचा पहिला मरणोत्तर अशोक चक्र हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला ते शहीद जवान बचित्तर सिंग यांची जयंती ऐतिहासिक नळदुर्ग शहरात गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच दि.१० जानेवारी २०२३ रोजी शहरांतील अहिल्याबाई होळकर चौकात साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले होते.

  दि.१० जानेवारी रोजी शहीद जवान बचित्तर सिंग यांची जयंती नळदुर्गच्या अहिल्याबाई होळकर चौकात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले. या कार्यक्रमास नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, माजी नगरसेवक नय्यर जहागिरदार,नितीन कासार, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार,शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,माजी नगरसेवक अमृत पुदाले,शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे, उमेश नाईक,पद्माकर घोडके, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे,अमर भाळे,आयुब शेख, दादासाहेब बनसोडे, श्री ठाकुर आदीजन उपस्थित होते.

         मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार व सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या हस्ते शहीद जवान बचित्तर सिंग यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यानंतर सर्वांनी त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी विनायक अहंकारी, कमलाकर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

 
Top