उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उद्धव ठाकरे शिवसेनेला धाराशिव-उस्मानाबाद जिल्ह्यात भले मोठे खिंडार पडले आहे.निष्ठावंतांनी पक्ष त्याग सुरू केल्याने ठाकरे सेनेला भले मोठे खिंडार पडले आहे.

 राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय (पप्पु) मुंडे,भीमा (आण्णा) जाधव, प्रवीण  पवार, हरिदास शिंदे,  विजय मुंडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट पक्ष प्रवेश केला आहे.

 ठाकरे सेनेला निष्ठावंत कार्यकर्त्याच्या प्रवेशाने मोठं खिंडार पडले आहे. ठाकरे सेनेच्या खासदार,आमदार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.निष्ठावंत कार्यकर्त्यांना ठाकरे सेनेमध्ये मानसन्मान मिळत नसल्याने  कार्यकर्त्यांची नाराजी वाढलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात बाळासाहेबांचे शिवसेना शिंदे गट पक्षाला वाढता पाठिंबा दिसत आहे.

 
Top