उस्मानाबाद / प्रतिनिधी-            

 शिराढोण येथे सरपंच व महिला ग्रामपंचायत सदस्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या हस्ते तसेच जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराढोण व परिसरातील गावातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलचे विजयी झालेले सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा तसेच सीआरपी यांचा सत्कार करण्यात आला.

 अत्याचारापासून मुलींनी आपला बचाव कसा केला पाहिजे, सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे यावर त्यांनी भाष्य केले. चित्रपट इंडस्ट्री व इतर ठिकाणी मुली अंगप्रदर्शन करतात त्यावर टीका करत सुसंस्कृत पिढी घडणे का गरजेचे आहे हे ताईंनी पटवून दिले. आई, बहीण, पत्नी म्हणून जगाने स्त्रीचा दर्जा मान्य केला आहे. यामुळे आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव ठेऊन स्त्रियांनी जगाची जनहित नायिका म्हणून काम करणे आवश्यक आहे. जगाचे मातृत्व स्त्रीने मान्य केले आहे. या मातृत्वाची जबाबदारी पार पाडत असताना समाजाशी कसे वागले पाहिजे? याचा विचार आपण करायला हवा. मोठ्या प्रमाणात विकृती वाढत आहे. या विकृती विरोधात आवाज उठवणे आणि स्त्रियांनी एकत्रित राहणे गरजेचे असल्याचे चित्राताई वाघ यांनी संबोधित केले.

 तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अविरत कार्य करणार असून महिला वरती होत असलेल्या अन्याय विरोधात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही दिली. जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि सौ.अर्चनाताई पाटील यांचे सामाजिक कार्य मोठे असून जनतेनेही त्याचे कौतुक केलेले आहे असे सांगितले.

 यावेळी बोलताना सौ. अर्चनाताई पाटीलम्हणाल्या की, आपल्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ या महिलांचे संघटन वाढवणे तसेच महिला व मुलींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत संपूर्ण राज्यभर दौरा करत आहेत. त्यांच्या या कार्यास आपला जिल्ह्यातून पूर्ण पाठिंबा आहे. तसेच शिराढोण गावाशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून गावाने पाटील कुटुंबियांना नेहमीच साथ दिलेली. हे गाव माझे माहेर समजत असून गावासाठी विकासासाठी आजपर्यंत विविध विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून यापुढे देखील निधि कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले.

 शिराढोण येथील ग्रामपंचायत सलग दुसर्‍यांदा आपल्याकडे राखल्याबद्दल माजी सरपंच पद्माकर पाटील, शिराढोणच्या नूतन नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लक्ष्मीताई म्हेत्रे, सुरेश महाजन, किरण पाटील, पवन म्हेत्रे, नवनाथ माळी तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्योती आर्य, मित्र नाईकवाडे, बेबीनंदा गोरे, अंजली गायकवाड, मीराताई पवार, रमेश हिम्मत पवार, गणेश महाजन, अशोक वाघे, अर्जुन सुडके, विजय गायकवाड, शिवाजी महामुनी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दाभा, हासेगाव, सौंदाना आंबा येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे मा.जि.प.सदस्या उषाताई यरकळ, भाजपचे गणप्रमुख राजेंद्र गुरव, जनार्दन महाजन, दीपक पाटील, राजपाल देशमुख’ आशा कर्मचारी अश्विनीताई गुरव, उमेद कार्यकर्त्या मनीषा सोमासे, गिरीताई, कंटेकरताई, सारिका पाटोदकर, समशाद तांबोळी इतर महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार ज्योती सुरेश महाजन ग्रामपंचायत सदस्य यांनी मानले.

 
Top