तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 13 जानेवारी पासून ते 20 जानेवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ,गाथा पारायण व तर 13 जानेवारी पासून 19 जानेवारीपर्यंत जगदगुरू तुकोबाराय चरित्रकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील,ह.भ.प.मधुकर महाराज सायाळ, ह.भ.प‌.चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज बावसकर, ह.भ.प.बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ह.भ.प.महादेव महाराज राऊत,ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी यांची किर्तने तर काल्याचे किर्तन ह.भ.प.रामभाऊ महाराज राऊत यांचे  होणार आहे. तर जगदगुरू तुकोबाराय चरित्रकथा  ह.भ.प.रामभाऊ महाराज  राऊत हे दुपारी दोन ते पाच सांगणार आहेत. (आळंदी देवाची ) यांचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


 
Top