उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अनु.जाती, वि.जा.भ.ज, इ.मा.व. व वि.मा.प्र. प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता असते. परंतु विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार समिती मंडणगड पॅटर्न नुसार विशेष मोहिम राबविण्यात आली.

 उस्मानाबाद जिल्हयातील सर्व महाविदयालयामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयामध्ये प्रस्ताव तपासून घेण्यात आले आणि आज दि.05 जानेवारी 2023 रोजी विदयार्थ्याना प्रवेशासाठी एक दिवसामध्ये 4 जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ज्या महाविद्यालयाचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव कार्यालयास सादर करावयाचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य बलभीम शिंदे, समितीचे अध्यक्ष तथा  संशोधन अधिकारी डॉ.बी.जी.पवार, बी. जी. अरवत यांनी केले आहे.


 
Top