तुळजापूर/ प्रतिनिधी-

 पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र स्टेट अॉलिंपिक स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्हा सॉफ्ट टेनिस संघ रवाना झाला. यात मुलांच्या संघात आदित्य सापते, स्वराज देशमुख, संजय नागरे, बबलू कावरे, यशराज हुंडेकरी यांचा समावेश आहे.

तर मुलींच्या संघात प्रियांका हंगरगेकर, प्रेरणा देशमुख, इश्वरी गंगणे, गार्गी पलंगे, प्राजक्ता हंगरगेकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र स्टेट अॉलिंपिक गेम्स २०२२ - २३ बालेवाडी पुणे येथे होत आहेत. दि. ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


 
Top