उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कृषीउद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी  'सकाळ ॲग्रोवन' कडून दिला जाणारा "बिझनेस एक्सलन्स अवार्ड 2023" हा पुरस्कार रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री व्यंकटराव गुंड यांना पुणे येथे प्रदान करण्यात आला.

उस्मानाबाद जिल्ह्यात उद्योगाची उभारणी करून, दुग्ध व्यवसाय, बँकिंग व्यवसाय, शैक्षणिक संस्था तसेच गूळ पावडर उद्योग उभा करून शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट कार्य, प्रतिकूल परीस्थितीतही उद्योग नावारूपास आणणे, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न, या गुंड साहेबांच्या कार्याची दखल घेत दैनिक सकाळने प्रतिष्ठेचा असणारा पुरस्कार श्री.गुंड यांना प्रदान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथील जे. डब्ल्यू. मेरीयट येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. प्रतापराव पवार, अध्यक्ष सकाळ वृत्तपत्र समूह यांच्याहस्ते श्री.गुंड यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्राज इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री.प्रमोद चौधरी, चंद्रकांत  गुड्डेवार ,  संपादक श्री. आदिनाथ चव्हाण उपस्थित होते. पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे श्री.गुंड यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


 
Top