वाशी  / प्रतिनिधी-

 व्हॉईस ऑफ मीडिया ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी पत्रकार संघटना असून या पत्रकार संघटनेची वाशी तालुक्याची कार्यकारणी  उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे कार्याध्यक्ष रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आली.

वाशी तालुक्यासाठी अध्यक्ष वैभव पारवे, दादासाहेब लगाडे कार्याध्यक्ष म्हणून निवड जाहीर झालेली आहे.

देशातील 20 प्रमुख संपादकांनी एकत्रित येत व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली आहे संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे कार्याध्यक्ष संजय आवटे राज्याध्यक्ष राजा माने हे आहेत. पत्रकारांचे आरोग्य,पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीचे प्रश्न, पत्रकारांच्यासाठी घर, पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाला जुळवून घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण, आदी विषयावर संघटना प्रामुख्याने काम करणार आहे.देशातील 22 राज्यात या संघटनेचा विस्तार झाला असून जवळपास 18 हजार पत्रकार या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. ग्रामीण भागापर्यंत या संघटनेचा विस्तार करण्यात येत असून नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

वाशी तालुका  कार्यकारणी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष वैभव पारवे,कार्याध्यक्ष दादासाहेब लगाडे ,उपाध्यक्ष अजय वीर, उपाध्यक्ष शिवाजी गवारे सरचिटणीस, ज्ञानेश्वर जोशी, सहसरचिटणीस राहुल शेळके ,खजिनदार कोषाध्यक्ष विशाल खामकर , कार्यवाहक नवनाथ टकले,संघटक विलास गपाट, प्रसिद्धी प्रमुख वैभव कुलकर्णी तर तालुका सदस्य पदी बळीराम जगताप, शहाजी चेडे, नेताजी नलावडे, सुधीर घोलप, प्रशांत कुदळे, शोएब काझी, विश्वनाथ जगदाळे, दत्तात्रय भराटे, शिवराम शिंदे, रामलिंग शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 
Top