उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मिलिंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल विधिज्ञ बांधवांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची दर पाच वर्षाला निवडणूक होते. महाराष्ट्र, गोवा, दीव दमण राज्यातील सदस्यांमधून अध्यक्ष पदाची निवड केली जाते. महाराष्ट्र, गोवा, दीव दमण राज्यातील सर्व वकील बांधवांची नोंदणी कौन्सिलमार्फत केली जाते. तसेच वकिलांच्या हितासाठी  तसेच कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. एखाद्या विधिज्ञाने जनहितविरोधी कार्य केल्यास त्याची चौकशी, वकिलांना सनद देणे, त्यांना कायद्याचे प्रशिक्षण देणे या माध्यमातून सक्षम वकील व न्यायाधीश निर्माण करुन न्यायव्यवस्था भक्कम करण्याचे काम कौन्सिलमार्फत केले जाते. विशेष म्हणजेयावर्षी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे 75 वे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना या कौन्सिलच्या अध्यक्ष पदाचा बहुमान उस्मानाबाद जिल्ह्याला मिळाला आहे. या कौन्सिलच्या माध्यमातून जनता, न्यायालय आणि वकील यांच्यातील दुवा म्हणून काम करुन ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचा विश्वास नूतन अध्यक्ष अ‍ॅड. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 
Top