उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पत्रकार देवीदास पाठक यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे. त्याची ही निवड राज्यपाल नियुक्त कोट्यातून झाली आहे.

त्यांनी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहाय्यता निधी संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून दिली आहे. ते विद्यार्थी आणि सर्वसामान्याच्या मदतीसाठी सतत अग्रेसर असतात. श्री.पाठक हे गेल्या अनेक वर्षापासून  पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांची जाण आहे. तसेच त्यांना जिल्ह्यातील विविध प्रश्‍न आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून त्या प्रश्‍नांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी या निवडीबद्दल आपण जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे.


 
Top