उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करणेकरीता दि. 12 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद या ठिकाणी आंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हा कार्यकारी समितीची विलास जाधव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

 सदर बैठकीस  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम.डी. तिर्थकर, उपशिक्षणाधिकारी, (माध्यमिक), जि.प. रावसाहेब मिरगणे,  शास्त्रज्ञ, के.व्ही.के. तुळजापूर, श्रीमती वर्षा मरवाळीकर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी   कुलदीप कुलकर्णी,  जि.प. अधिकारी कार्यालय,  व्ही. एस. सोमारे, जिल्हा पणन अधिकारी, लक्ष्मण कुंभार, मुख्याधिकारी, नगरपरिषद-नळदुर्ग, सचिन भुजबळ, मुख्याधिकारी, नगरपरिषद-मुरुम, अरविंद नातू, मुख्याधिकारी-नगरपरिषद- तुळजापूर, श्रीमती शोभा कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी माविम,   गोरखनाथ, भांगे, जिल्हा समन्वयक उमेद,  आर.पी. कोलगणे, अव्वल कारकुन, जिल्हाधिकारी कार्यालय,  आर.डी. वाघमारे, नगर अभियंता, नगरपरिषद, उमरगा, आर.एच. चव्हाण, प्रतिनिधी नगरपरिषद-कळंब, एस. आर. तोरकड, प्रतिनिधी, जिल्हा महिलाबाल विकास कार्यालय,  श्रीमती एस. ए. गवळी कार्यालयीन अधीक्षक, सहा. आयुक्त समाजकल्याण विभाग  हे प्रतिनिधी उपस्थित होते.

 बैठकीच्या सुरुवातीस विलास जाधव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. उस्मानाबाद यांनी केंद्र शासनाचे पत्र दि. 07 डिसेंबर 2022 व शासन निर्णय दि. 17 नोव्हेंबर 2022 व मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे दि. 26 डिसेंबर 2022 नुसार जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यकारी समिती

  गठीत करण्यात आली आहे असे नमूद केले. एम.डी. तिर्थकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी आंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करणेकरीता प्रस्तावित करुन संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सभेमध्ये मा. श्री. विलास जाधव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. उस्मानाबाद यांनी पौष्टिक तृणधान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, भगर (वरई) व नागली या पिकाचा यामध्ये समावेश होत असून पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व समजावून सांगून पौष्टिक तृणधान्याचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये करावा याची सुरुवात प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटूंबापासून करावी. आजच्या धावपळीच्या जिवनात पौष्टिक तृणधान्याचा समावेश आपल्या आहारात केल्यास व्यक्तीस मधुमेह, बध्दकोष्टता, हृदयरोग या सारख्या रोगांची रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊन व्यक्तीस निरोगी आयुष्य सहजपणे जगता येईल असे सभेमध्ये सांगीतले.

 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी आंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करताना जिल्ह्यामध्ये माहे फेब्रुवारी-2023 मध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नमुद केले. पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करताना पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषणमुल्य व त्याचे आहारातील महत्व सामान्य नागरीकांना पटवून देणेकरीता विविध कार्यशाळा पथनाट्य, आहार तज्ज्ञांची चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करणे, प्रभात फेरी/रोड शो/बाईक रॅली आयोजित करणे, मिलेट दौड आयोजित करणे  व पौष्टिक तृणधान्य पिकापासून तयार होणाऱ्या पाककला/ पाककृती स्पर्धांचे आयोजन करणे ईत्यादी कार्यक्रम महिनावार घेण्यात येणार आहेत असे नमूद केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी “मिलेट ऑफ दि मंथ” म्हणजेच तृणधान्य विशेष महिना या संकल्पनेनुसार महाराष्ट्ऱातील सण व खाद्य संस्कृतीनुसार महिनानिहाय


पौष्टिक तृणधान्याचे सेवन करण्यात येणार असल्याची माहिती सभेमध्ये दिली. “मिलेट ऑफ दि मंथ” म्हणजेच तृणधान्य विशेष महिना ही संकल्पना जनमानसामध्ये रुजविण्याकरीता त्या त्या महिन्यात संबंधित पिकाबाबत गाव पातळीवर जनजागृती मोहिम घेण्यात येणार असल्याची माहिती सभेमध्ये दिली.

 
Top