उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणू नये असा हट्टागृह धरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या विधानांचा निषेध करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.  धाराशिव भारतीय जनता पक्षाचे नेते मा.आ.राणाजगजितसिंह  पाटील व मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जोरदार घोषणा दिल्या,अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

 यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, अभय इंगळे, सरचिटणीस नितीन भोसले, प्रदीप शिंदे, सोशलमीडिया प्रदेश सदस्य पांडुरंग पवार, पांडुरंग लाटे, मकरंद पाटील, इंद्रजित देवकते, भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, ओम नाईकवाडी, विनोद निंबाळकर, अमोलराजे निंबाळकर, प्रविण पाठक, शेषेराव उंबरे, बापु पवार, दाजी अप्पा पवार, प्रविण सिरसाठे, मोहन मुंडे, सुजित साळुंके, विनायक कुलकर्णी, जगदिश जोशी, गीरीष पानसरे, हिम्मत भोसले, वैभव हंचाटे, संदिप इंगळे, आशीष नायकल, रमण जाधव, सुधीर नायकल, सचिन लोंढे, सुनिल पंगुडवाले, अमीत कदम, रोहित देशमुख, प्रिमत मुंडे, ज्ञानेश्वर सुळ, गणेश एडके, संदिप कोकाटे, नरेन वाघमारे, रमजान तांबोळी, बबलु शेख, अमोल पेठे, स्वप्नील नाईकवाडी, महेश लांडगे, प्रसाद मुंडे,  यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top