उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अजित पवारांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वादग्रस्त विधान केले आहे. पण वास्तव पाहता त्यांनी. धर्मासाठी व स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे ते धर्मवीर तसेच स्वराज्यारक्षक ही आहेत. तरुणांना  व या देशातील नागरिकांना अजित पवार कोणता इतिहास सांगत आहेत हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू तरुण हिंदू धर्माचे रक्षण तसेच पालन करत आहोत. पण आमच्या पवारांनी आमच्या श्रद्धा स्थानावर घाव घातला आहे त्यामुळे आम्ही हिंदू संघटनांनी मिळून त्यांचा जोडे मारून निषेध केला आहे. अजित पवारांनी समोर येऊन वक्तव्य मागे घ्यावे व संपूर्ण हिंदू समाजाची हात जोडून माफी मागावी  अशी आम्ही मागणी करत आहोत. तसेच हिंदू संघटनेतील तरुण यांनी अशीही मागणी केली आहे की छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण आता बंद झालं पाहिजे नाहीतर आम्ही यापेक्षाही कठोर पावले उचलू. या वेळी विविध हिंदू संघटनांचे तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते. अजिंक्य मुंडे, अभिजित मगर, प्रतिक मेंढेकर, सागर पवार, विवेकानंद सावंत, अजिंक्य मुळे, अनिल जत्ती, धीरज साळुंके इत्यादी शिवशंभू प्रेमी उपस्थित होते.


 
Top