उमरगा / प्रतिनिधी - 

 शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्या बद्दल केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांची  भेट घेऊन महाराष्ट्रातील शेती विकासा बद्दल व सामाजिक कार्याचा आदर्श पॅटर्न तेलंगणा राज्यात राबविणार असल्याचे सांगितले ! 

शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी राज्यातील शेती विकासाला चालना मिळावी ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात या करीता कृषि प्रदर्शन , शेती व्यावसाया करिता अर्थसाह्य , आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियाना अर्थसाह्य इत्यादी शेतकरी हिताचे विविध उपक्रम हाती घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्याना न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्या कार्याची दखल घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनीवार दि. ७ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी भेटीचे आमंत्रण दिले होते.या भेटीत राजकिय , कृषि , सामाजिक या विविध विषयावर सुमारे एक तास चर्चा करण्यात आली.

तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पुढाकारातून तेलंगणा राज्याला किसान बंधू योजना , दलित बंधू योजना, सिंचना साठी अत्याधुनिक तंत्रज्ञान पध्दतीचा वापर या विविध विषयावर शेतकरी नेते विनायकराव पाटील व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात प्रदीर्घ   चर्चा झाली.यावेळी या योजनांच्या अंमलबजावणी मुळे राज्यातील शेतकरी आत्महत्तेचे प्रमाण शुन्यावर आल्याचे मुख्यमंत्री राव यांनी सांगितले.विनायकराव पाटील यांनी देशाच्या सर्वांगीण विकासा साठी आमच्या सोबत काम करावे अशी अपेक्षा केली.

या वेळी तेलंगणा प्लॅनिंग कमिशनचे व्हाईस चेअरमन विनोदकुमारजी,प्रा.डॉ. राम सोलंकर, नितीन पाटील यांची उपस्थिती होती.

शेतकरी नेते विनायकराव पाटील यांची भेट घेऊन देशातील राजकिय , सामाजिक व कृषि या विविध विषयावर मुख्यमंत्री राव यांनी सकारात्मक संवाद साधल्या बद्दल पाटील यांच्या सामाजिक कृषि विषयक कार्याचे बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्री राव यांच्या शेतकरी धोरणांच्या अंमलबजावणी बाबत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली . तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यां साठी असलेल्या विविध योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्या करिता राबविण्या साठी महाराष्ट्र सरकार कडे पाठपुरावा करण्याचा संकल्प शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी केल्याचे सांगितले .

 
Top