उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून  पोलीस मुख्यालयात प्रत्यक्ष पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नुतन वर्षाच्या सुरवातीस म्हणजे 02.01.2023 पासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होत आहे.  त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील युवक- युवती यांसाठी प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रीया कशी असते याचे प्रात्याक्षिक करुन घेण्यात आले. यामध्ये युवक- युवतींची उंची मोजणे, गोळा फेक, 100 मीटर धावणे या मैदानी चाचण्यांचा समावेश करण्यात येउन या मेळाव्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 300 ते 400 युवक- युवती सहभागी झाले होते. बहुतांश युवक- युवती प्रथमच पोलीस भरतीसाठी पात्र असल्याने त्यांना एकंदरीत भरती प्रक्रिया कशी असते याचा अनूभव घेता आला.

 सदर वेळी राखीव पोलीस निरीक्षक  अरविंद दुबे, सहायक पोलीस निरीक्षक  अमोल पवार, श्रीकांत भराटे यांनी उपस्थित युवक- युवतींना पोलीस भरतीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. पोलीस भरती प्रक्रिया कशी असते याचा प्रत्यक्ष अनूभव घेतल्यानंतर युवक- युवती यांनी मा. पोलीस अधीक्षक,  अतुल कुलकर्णी यांसह अधिकारी- अंमलदारांचे आभार व्यक्त केले.


 
Top