उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   मूळ मराठवाड्यातील असलेले परंतु व्यवसाय निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेले नितीन चिलवंत, शिवकुमार बायस व त्यांचे सहकारी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ यांची जन्मभूमी असलेल्या कर्नाटक मधील सिंदगी येथून संपूर्ण मराठवाड्याच्या आठही जिल्हा मध्ये "पवित्र माती मंगल कलश यात्रा" करत आहेत. त्यांची यात्रा धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्यापासून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीच्या वतीने हिप्परगा रवा, तुळजापूर, चिलवडी व शेवटी धाराशिव येथील हुतात्मा स्मारक असे ठिकठिकाणी समितीतर्फे त्यांचे स्वागत व  सत्कार करण्यात आला.

यावेळी नितीन चिलवंत यांनीही छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली शिवनेरी येथील पवित्र माती मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती जिल्हा धाराशिव चे संयोजक युवराज नळे यांच्याकडे सुपूर्द केली. नितीन चिलवंत करत असलेल्या कार्याचे समितीतर्फे कौतुक करून या अभिमानास्पद कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . याप्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्राम समिती जिल्हा धाराशिव चे संयोजक युवराज नळे, मार्गदर्शक बुवासाहेब जाधव, एडवोकेट महेंद्र देशमुख, गुलचंद व्यवहारे, प्रमोद बचाटे, अण्णासाहेब जाधव, नामदेव वाघमारे,मुरलीधर होणाळकर, मोहन सुरवसे, निखिल शेंडगे, नितेश कोकाटे, राजाभाऊ कारंडे, विजय यादव, अनिल अतणूरे, पांडुरंग जाधव यांचे सह समितीचे पदाधिकारी  उपस्थित होते.


 
Top